क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी काॅलेजमधील प्राचार्य आणि विद्यार्थाचा वाद ;अखेर पाचजणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालयात फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी मारहाण केली.यामध्ये विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती .ही घटना बुधवारी ( दि . 29 ) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली आहे .या घटनेला आता वेगळे वळण लागले असून दोन परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुर पुर्ण नाव पत्ता माहिती नाही व त्याचे 3 साथीदार या चौघांविरुद्ध शुभम कैलास बारोठ या विद्यार्थ्यांने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर शुभमच्या विरोधात सुरेश गणपत देसाई यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास महात्मा फुले महाविद्यालयात शुभम फि भरण्यासाठी  व त्याचा स्वतःचा टी वाय बी . मास कम्युनिकेशनचा निकाल घेण्यासाठी गेला होता फि भरण्यावरुन कॉलेजचे प्राचार्य व तक्रारदार यांच्यात वाद झाल्याने शाळेतील शिपाई यांनी तक्रारदार यांना प्लॅस्टिकची खुर्ची व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले आहे. 

दरम्यान, शुभम  व प्राचार्य यांच्यात शाळेची फि भरण्यावरुन बोलणे चालु असताना शुभम याने फि न भरण्याच्या व फि माफ करण्याच्या कारणावरुन गोंधळ घालुन काचेच्या दरवाज्यावर स्वतःचे डोके आपटुन दरवाज्याची काच फोडुन स्वतःला जखमी करुन सुरेश देसाई यांना जखमी केले. असे सुरेश  देसाई यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.त्यामुळे शुभमसह अजून चौघांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: