बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत राष्ट्रवादी लीगल सेलच्या वतीने कायदेशीर मोफत सल्ला केंद्राचे उद्घाटन

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयात आज गुरुवारी (26 ऑगस्ट) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या वतीने कायदेशीर मोफत सल्ला केंद्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, एस एन बी पी कॉलेज च्या प्रिन्सिपल डॉ. रोहिणी जगताप, लीगल सेल चे अध्यक्ष गोरक्ष लोखंडे व इतर पदाधिकारी याच्या हस्ते करण्यात आले.

महिला समता दिन निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे च्या कार्याची प्रस्तावना राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल चे शहर अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड. सोनाली घाडगे यांनी महिलांचे कायदे तसेच लीगल सेल च्या माध्यमातून महिलाना कशी मदत करणार याची माहिती दिली, व लीगल सेल च्या माध्यमातून महिला सक्षमीकरण कसे केले जाणार याची माहीत दिली. यावेळी माधव पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिलांच्या समस्या वकिल टीम ने जाणून घेतल्या व योग्य मार्गदर्शन केले लीगल सेल च्या टीम च्या माध्यमातून दर गुरुवारी दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये कार्यक्रम घेण्यात येणार आहे

यावेळी ॲड. सुशील मंचारकर, ॲड.अतुल कांबळे, ॲड.सोनाली घाडगे, ॲड. वैशाली देशमुख, ॲड. स्मिता पानसरे , ॲड.कविता ताटे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल च्या महिला अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन कविता खराडे यांनी केले . लीगल सेल चे शहर अध्यक्ष गोरक्ष लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

Share this: