क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अंजठानगर मधील मटका जुगार अड्यावर पोलिसांचा छापा;निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निगडी (वास्तव संघर्ष) : निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजठानगर येथे अवैधरित्या मटका जुगार खेळणाऱ्या अड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान समता बिल्डींगच्या समोर ,पिंपळाच्या झाडाखाली अंजठानगर येथे घडली आहे.

पोलिस नाईक कठय्या गुरय्या स्वामी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रतिक त्रिबक गायकवाड (वय-20 रा. सिध्दार्थ होसिंग सोसायटी अंजठानगर ) विजय गरड (वय माहीती नाही रा.अशोका बिल्डीग अंजठानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान समता बिल्डींगच्या समोर ,पिंपळाच्या झाडाखाली अंजठानगर येथे यातील आरोपी हे अवैधरित्या मटका जुगार अडा चालवत होते. ते येणारे अंक आकड्यावर येणा-या जाणाऱ्या लोकांकडुन पैसे लावुन घेत कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत होते. पोलिसांनी छापा टाकला असता त्यांच्याकडून रोख रक्कम 5580 जुगाराचे साहित्य 1 मोबाईल फोन असा एकुण 8580 असा मुद्देमाल मिळुन आला आहे . सदरील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

Share this: