बातम्यामहाराष्ट्र

निलेशच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय होईल याचा अंदाज करा-नारायण राणे

रत्नागिरी – निलेशच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय होईल याचा अंदाज करा, असा धमकी वजा इशारा माजी मुख्यमंत्री तसेच निलेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी दिला आहे. निलेश राणे यांच्या प्रचारार्थ जाकादेवी येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी राणेंनी विरोधकांवर टीका करत इशारा दिला.

काही लोक निलेशच्या स्वभावाचा फायदा घेत आहेत. त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्या लोकांना माझे सांगणे आहे, की निलेशच्या वाट्याला कोणी जाऊ नका. त्याच्या वडिलांचे नाव नारायण राणे आहे. त्यामुळे त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय होईल याचा अंदाज करा, असं नारायण राणेंनी यावेळी म्हटलं.

हातखंबा-रत्नागिरी मार्गावर झालेल्या गाडी तपासणी वेळी वाद झाला होता. त्यामुळे निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून रत्नागिरीतील राजकारणाला वेगळाच रंग चढला आहे. यावरूनही नारायण राणेंनी पोलीसांना खडसावले. पोलिसांनी कायद्याचे राज्य जरुर दाखवावे. पण, पक्षपात करू नये. आम्ही नियम तोडत नाही. नियम करणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे कोणी कायदा शिकविण्याचा प्रयत्न करू नये, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, निलेश राणे प्रामाणिकपणे काम करतोय. खासदार नसला तरी गेली ५ वर्षे तो रत्नागिरीत कार्यरत आहे, असं म्हणत त्याचे कौतुकही त्यांनी केले.

Share this: