क्राईम बातम्याबातम्या

 ‘फोनवर कुणासोबत बोलतेस’ विचारणाऱ्या पतीवर पत्नीचा प्राणघातक हल्ला

वास्तव संघर्ष – पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रायकर मळा येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली. फोनवर बोलणाऱ्या पत्नीला कोणासोबत बोलतेस असे विचारणा करणाऱ्या पतीवर पत्नीनेच चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पतीच्या गळ्यावर चाकूने वार केले असून तो गंभीर जखमी आहे.

अधिक माहिती अशी की, रायकर मळा येथे हे दाम्पत्य राहतात. मंगळवारी रात्री कामावरून पती घरी आला असता त्याला  पत्नी फोनवर बोलताना दिसली. यावेळी त्याने कोणासोबत बोलतेस, तो फोन मला दे अशी विचारणा केली. यामुळे रागावलेल्या पत्नीने स्वयंपाक घरातील चाकू घेऊन पतीवर हल्ला चढवला. यामध्ये त्याच्या गळ्यावर, हातावर आणि बरगड्यावर वार झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू

 

 

Share this: