पिंपरीतील हॉटेल घरोंदाच्या दुसऱ्या मजल्यावर फाशी घेऊन तरुणाने केली आत्महत्या
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमधील एका कार्यालयात एका तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना आज शुक्रवार (दि. 1) रोजी सकाळी अकराच्या सुमारास पिंपरीतील मोरवाडी हॉटेल घरोंदाच्या दुसऱ्या मजल्यावर उघडकीस आली आहे.
आत्महत्या केलेल्या मृत तरूणाची ओळख अद्याप पटली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील हॉटेल घरोंदाच्या दुसऱ्या मजल्यावर एक खाजगी कार्यालय आहे. या ठिकाणी एक तरुण कामगार म्हणून काम करत आहे. या कार्यालयातील या तरूणाने कार्यालयातील पंख्याला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.
चिट्ठी लिहून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे . घटनास्थळी पिंपरी पोलीस पोहचले आहेत. या तरुणाने आत्महत्या का केली? या तरुणाचे पुर्ण नाव काय? याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.