प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी मागितली जाहीर माफी
दिपक साबळे… (वास्तव संघर्ष) प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी त्याच्या किर्तनात महिलांविषयी बेताल वक्तव्य केले होते ते म्हणाले होते की . ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान इंदुरीकर यांनी एका ४ जानेवारीला यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या त्यांच्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये केले होते.
यावर गेले आठवडाभर त्यांच्यावर समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती तसेच सोशलमिडीयावरही त्यांना टिकेला सामोरे जावे लागले होते. जसे त्यांचे विरोधक होते तसे त्यांना समर्थन देणारेही होते माञ या वादावर स्वतः निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पडदा टाकत एक पञक काढून जाहीर माफी मागितली आहे.
मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून माझ्या २६ वर्षांच्या किर्तनरूपी सेवेत समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलनावर भर दिला होता. समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केली आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असे एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे