क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने दुकानदारास तीन जणांनी केली दगडाने मारहाण;वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) – शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एका दुकानदारास तीन जणांनी दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले.ही घटना जय मल्हार नगर , थेरगाव येथे गुरुवारी ( दि . 12 ) रात्री घडली .

सूर्यकांत मोगलय्या गुत्तेदार ( वय 32 , रा . कैलासनगर , थेरगाव ) यांनी शुक्रवारी ( दि . 13 ) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

मेहबूब पटेल , स्वप्नील सागर आणि अनोळखी व्यक्ती ( नाव , पत्ता माहिती नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी सूर्यकांत हे त्यांच्या दुकानाच्या जवळ असलेल्या चायनीजच्या दुकानात थांबले होते . त्यावेळी तीन आरोपी तिथे आले . त्यांनी शिवीगाळ करीत तुला दुकान बंद करायचे नाही का , अशी विचारणा केली . त्यावेळी फिर्यादी सूर्यकांत यांनी शिव्या का देता , अशी विचारणा केली . या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना दगडाने मारहाण करून जबर जखमी केले . अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत .

Share this: