क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील दुसरी घटना :सुरक्षिततेची साधने न दिल्याने बांधकाम कामगाराचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

वाकड (वास्तव संघर्ष) -थेरगाव येथील बांधकाम साईटवर काम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला .शहरातील ही दुसरी घटना असून बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची कोणतीही साधने न पुरविता कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या बिल्डर ठेकेदार व बांधकाम मालकावर गुन्हा दाखल होतो माञ कामगारांच्या परिवारांकडे कुणीही लक्ष देत नाही. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी थेरगाव येथे घडली असून वाकड पोलीस ठाण्यात ठेकेदार व बांधकाम मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश भिमा म्हस्के ( वय 36 ) असे बांधकाम साइटवरून पडून मृत्यमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे .

ठेकेदार गणेश गुंडागळ ( पूर्ण नाव आणि पत्ता माहिती नाही ) आणि बांधकाम मालक लक्ष्मण सिताराम कुदळे ( रा . गणेशनगर , थेरगाव ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .

पल्लवी सुरेश म्हस्के ( वय 33 , रा . भगवान नगर , भूमकर चौक , वाकड ) यांनी बुधवारी ( दि . 11 ) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांचे पती आरोपी ठेकेदार गणेश गुंडागळ आणि बांधकाम मालक लक्ष्मण कुदळे यांच्याकडे काम करीत होते . त्या दोघांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट दिले नाही . तसेच सुरक्षा जाळीही बांधली नाही . यामुळे 7 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बांधकाम साइटवरून पडल्याने कामगार सुरेश म्हस्के यांचा मृत्यू झाला . अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत .

Share this: