क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्र

संतापजनक : मुल होत नाही म्हणून महिलेला खायला दिले मृत माणसाची हाडे आणि घुबडाचे पाय

पुणे (वास्तव संघर्ष) : मुलबाळ होत नसल्यामुळे आघोरी पूजा करुन त्यात मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके याचा वापर करून त्या हाडाची पावडर विवाहित महिलेला जबरदस्तीने खायला लावली. तसेच स्मशानभूमीतून हाडे, राख आणून त्याची पूजा करुन ती राख पाण्यात मिसळून विवाहितेला पिण्यास दिली. हा धक्कादायक  प्रकार 27 एप्रिल 2019 ते आजतागायत पुण्यातील सिंहगडरोड धायरी येथे घडला आहे.

याबाबत पिडीत महिलेने  सासरच्याकडील लोकांवर विवाहितेचा छळ तसेच महा नरबळी व अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादुटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.


त्यानुसार पती जयेश पोकळे, दीर श्रेयश पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती कृष्णा पोकळे, दीपक जाधव, बबिता जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांनी या विवाहितेच्या आई-वडिलांकडे वारंवार पैशाची मागणी केली. इतकच नाही तर घरात भरभराट व्हावी आणि या महिलेला मुलगा व्हावा यासाठी पती सासू-सासरे धीर जाऊ यांनी मिळून घरात वारंवार अघोरी पूजा केली.प्रत्येक अमावस्येला आरोपी एकत्र जमून काय कपडे घालत आणि तळघरात अघोरी पूजा करत. कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती डबघाई झाल्यानंतर आरोपींनी अमावस्येच्या दिवशी अघोरी पूजा मांडली.

अमावस्येच्या दिवशी सर्व आरोपी जवळच्या स्मशानभूमीमध्ये गेले. तिथे झालेल्या मृतदेहाचे हाडे गोळा केली राख घेतली.हे सर्व घरी आणले आणि त्याची पूजा करून हे पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिले.त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी या महिलेच्या जावेच्या निगडी येथील घरी पूजा घालण्यात आली. त्यासाठी मयत माणसाचे केस, हाडे, घुबडाचे पाय, आणि कोंबडीचे धड हे सर्व आधीच आणून ठेवले होते. त्यानंतर एका मांत्रिक महिलेने या ठिकाणी अघोरी पूजा केली.मानवी हाडाची भुकटी या महिलेला खाण्यास भाग पाडली. फिर्यादीने खाण्यास नकार दिल्याने बंदुकीच्या धाकाने तिला पावडर खाण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर तू पांढऱ्या पायाची आहेस तसेच मूल होत नाही म्हणून वाईट शब्द वापरुन फिर्यादीचा छळ केला. अ‍ॅड. हेमंत झंझाड यांच्या पुढाकाराने सदरील घटनेचा पर्दाफाश करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share this: