हिजवडीत मोबाईल शॉपीमधून विविध मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) :हिंजवडी पोलीस ठाणे हद्दित दि . २६/०८/२०२० रोजी रात्रीच्या दरम्यान राज मोबाईल शॉपी या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटुन त्यातील विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरुन नेल्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असल्याने मा . पोलीस आयुक्त , यांनी गुन्हे शाखा युनिट -४ , पिंपरी चिंचवड यांना सदर गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघड करण्याचे आदेश दिले होते .त्यानुसार शनिवार (दि . १२) रोजी चार ते पाच आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे
जटवा ऊर्फ बाबा जुनई खान , हजरत अली खान , इमरान अली , (तिन्ही रा . वारजे मुळ राहणार उत्तर प्रदेश) कामरान अन्सारी ऊर्फ मोनु , (रा . भिवंडी) या आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील १०० पेक्षा जास्त सी.सी.टि.व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्या नंतर सदर प्रकरणात ५-६ आरोपी असल्याचे व सदर आरोपींनी गुन्हा करते वेळी पांढऱ्या रंगाच्या इको गाडीचा वापर केल्याचे आढळुन आले . परंतु रात्रीची वेळ असल्याने कोणत्याही ठिकाणी आरोपीची अथवा गाडीची ओळख पटेल असे फुटेज मिळुन आले नाही . तेव्हा सदर गुन्हयाच्या अनुशंगाने सखोल तांत्रिक तपास केला असता सदरचा गुन्हा भिवंडी , ठाणे येथिल सराईत गुन्हेगार गुडू जलेबी याने त्याच्या साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाले .
दि . १२ / ० ९ / २०२० रोजी पहाटे सदर आरोपीचा शोध घेणे कामी एक पथक भिवंडी येथे जाण्याच्या तयारीत असताना त्या आधीच माहिती प्राप्त झाली की सदरचा आरोपी हा त्याचे साथीदारासह वारजे परिसरात असुन तो भिवंडीला जाण्याच्या तयारीत आहे . तेव्हा गुन्हे शाखा युनिट -४ , चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुणे – मुंबई जाणाऱ्या हायवे वर सापळा रचुन पुणावळे परिसरात हॉटेल तंदुरी नाईट समोर आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या गुन्हयात वापरलेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या इको गाडी नंबर- एम एच ०४ जी यु ८७१० सह गाडीच्या डिक्कीत गुन्हयात चोरीस गेलेले विविध कंपन्यांचे २३ मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ , सहा.पोलीस आयुक्त राजाराम पाटील गुन्हे यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा , युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन दा . शिंदे , सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , पोहवा / प्रविण दळे , नारायण जाधव , संजय गवारे , धर्मराज आवटे , दादाभाऊ पवार , अदिनाथ मिसाळ पोना / संतोष असवले , तुषार शेटे , लक्ष्मण आढारी , मो . गौस नदाफ , वासुदेव मुंडे पोशि / शावरसिध्द पांढरे , प्रशांत सैद , सुनिल गुट्टे , तुषार काळे , सुरेश जायभाये , अजिनाथ ओंबासे , धनाजी शिंदे , सुखदेव गावंडे , गोंविद चव्हाण व नागेश माळी , राजेंद्र शेटे तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखा यांनी केली आहे .