क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत हल्ला झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू ;17 आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीगावातील राही अपार्टमेंटच्या टेरेसवर एका तरुणाचा खून करण्यात आला . ही घटना शुक्रवारी ( दि .30 ) पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे.याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय अनिल काशीद ( वय 20 , रा . पवार नगर , थेरगाव ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे .

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कृष्णा बाळू पारधे उर्फ बॉक्सर , बाळ्या , तौसीफ , सचिन सौदाई , अजय टाक , जतीन मेवानी , अनिल पिवाल , कपिल टाक , तरुण टाक , आतिश ननावरे , जय पिवाल , विनय वेद , सद्दाम शेख , खलील शेख , अरुण टाक , जतिन टाक , खुबचंद मंगतानी या आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी महिला घराच्या बेडरुममध्ये पती व मुलीसह झोपले होते तर पाठीमागील बेडरुममध्ये फिर्यादी महिलेच्या मामाचा मुलगा कृष्णा पारधे उर्फ बॉक्सर व त्याची पत्नी सिमरण झोपले होते.फ्लॅटचा समोरील दरवाजा कोणीतरी वाजू लागले . त्यामुळे फिर्यादी यांनी दरवाजा उघडला तेव्हा अक्षय अनिल काशीद हा दरवाजामध्ये उभा होता .फिर्यादीने महिलेने अक्षयला तू इतक्या रात्रीचा इथे कशाला आलास, अशी विचारणा केली.अक्षयने फिर्यादी महिलेला बेडरुम समोर कोणाच्या चपल्या आहेत , असे विचारत त्यांना बाहेर बोलवण्यास सांगितले व फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली . आरडाओरडा ऐकून बेडरुमच्या आत झोपलेला फिर्यादीच्या मामाचा मुलगा आरोपी कृष्णा पारधे बाहेर आला . आरोपी कृष्णाने अक्षयला ‘ तु कोण आहेस व तु इथे काय करतोस ‘ , अशी विचारणा केली . हा अक्षय असून माझ्या सोबत लग्न करणार आहे . तु त्याला काही बोलु नकोस असे फिर्यादी महिलेने आरोपी कृष्णा पारधे याला सांगितले .त्यानंतर आरोपी कृष्णाने अक्षयला शिवीगाळ करुन हाताने मारण्यास सुरुवात केली .नंतर आरोपी कृष्णा पारधे उर्फ बाॅक्सर त्याच्या पत्नीला सोडवण्यासाठी घरी गेला व सोबत आरोपी बाळ्या व तौसीफ यांना घेऊन आला . त्यानंतर टेरेसवर असलेल्या अक्षयला तीनही आरोपींनी मारहाण केली . यावेळी अक्षयने फिर्यादी महिलेचायांचा मोबाईल घेऊन पोलीसांना फोन करून ‘ मला पोलीस मदत पाहीजे ‘ असे , सांगितले .

मात्र , आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावला.अक्षय जीव वाचविण्यासाठी जोरजोरात आरडा ओरडा करीत जिन्यावरुन खाली पळत असताना अपार्टमेंन्टमधील लोक दरवाज्याच्या बाहेर आले . आरोपींनी हातातील लाकडी दांडके उंचावून ‘ आमच्या मध्ये कुणी पडले तर त्याला जिवंत सोडणार नाही ,आम्ही खुबचंद मंगतानीची माणसं आहोत ‘ , अशी धमकी दिली . त्यानंतर आरोपींनी अक्षयला मारहाण केली व टेरेसवरुन खाली फेकून देत त्या ठिकाणावरुन पळ काढला . अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले माञ उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Share this: