बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची कोंडी ;सत्ता भाजपची मात्र महापौर पदावर दावा राष्ट्रवादीचा

दिपक साबळे..! पिंपरी (वास्तव संघर्ष)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले असून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि संलग्न अपक्ष महिला उमेदवारांना महापौर पद खुणावू लागले आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांनी महापौरपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.

माञ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी बाकावर बसलेल्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीनेही महापौर पदासाठी आपल्या इच्छुक नगरसेवकांकडे अर्ज दाखल करण्याची मागणी केली आहे यामुळे सत्ताधारी भाजप पक्ष आणखी कोंडीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ता भाजपची माञ महापौर पदावर दावा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा असेल का हे पाहण्यायोग्य असेल.शेवटी पक्षीय बहुमत कोणत्या पक्षाला मिळते हे पाहावे लागेल कारण शिवसेनेचे आणि मनसेचे नगरसेवक कुणाच्या पारडय़ात मतदान करतील हे शुक्रवार( दिनांक २२) लाच समजेल

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने नगरसेवकांना दिलेल्या पञात काय म्हटले आहे?    

  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवार दिनांक २२/११/२०१९ रोजी  स. ११.०० वाजता होणार आहे. महापौर पदाचे  “खुला (महिला)”  प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेले आहे. तरी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या “खुला (महिला)” प्रवर्गातील नगरसदस्यांना  कळविणेत येते की, महापौर पदासाठी जे सन्मानिय नगरसदस्य इच्छुक आहेत तसेच उपमहापौर पदासाठी जे सन्मानिय सदस्य इच्छुक आहेत, त्यांनी रविवार दि. १७/११/२०१९ सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत लेखी अर्ज मा. विरोधी पक्षनेते यांच्याकडे दाखल करावेत. सदरील पञ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी

Share this: