बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा भरून काढणे हे कर्तव्यच : आमदार सुनील शेळके

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्धापनदिनानिमित्त मोशीत रक्तदान व वृक्षारोपण

पिंपरी(वास्तव संघर्ष) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर संघटनेने शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. आज मोशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अतिष बारणे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्त संकलन अभियानात आपले योगदान दिले. कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. आज कोरोनाच्या संकटात रक्ताचा तुटवडा भरून काढणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून त्या भावनेतून रक्तदात्यांनी पुढे यावे असे आवाहन यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.

वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेने रक्तदान करावे आणि सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले होते.

‘कोरोना’ च्या साथीमुळे राज्यामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी कर्तव्य भावनेतून पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

मोशी येथील आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ताकाका साने माजी उपमहापौर शरदशेठ बोऱ्हाडे, नगसेवक वसंतशेठ बोराटे, नगरसेवक विक्रांत लांडे, मा. नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट, उत्तम आल्हाट, नितिन सस्ते, निखिल बोऱ्हाडे, विशाल जाधव, राहुल बनकर , निलेश बोराटे, प्रशांत सस्ते, दीपक बारणे अदिनाथ बारणे, आकाश बारणे आदी उपस्थित होते.

Share this: