महिलेला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून विनयभंग;खराळवाडीतील एकावर गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) -पिंपरी चिंचवडच्या परिसरातील एका महिलेला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सुनील शिंदे ( रा . खराळवाडी , पिंपरी ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .
याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रविवारी ( दि .7 ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादी महिलेच्या व्हाट्सअपवर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले . त्यामुळे फिर्यादी महिलेने ते फोटो आणि मेसेज डिलीट करून आरोपीचा नंबर ब्लॉक केला . सोमवारी ( दि .8 ) सकाळी सहा वाजता दुस – या नंबरवरून आरोपीने अश्लील फोटो आणि मेसेज पाठवल्याचे निदर्शनास आले .
फिर्यादी महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला असता आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र असल्याचे समजले . आरोपीने यापूर्वी फिर्यादीच्या भाचीला देखील अशाच प्रकारचे अश्लील मेसेज पाठवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत .