छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात पिंपरीत आंदोलन

पिंपरी (वास्तव संघर्ष) :कर्नाटक, बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात पिंपरीतील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी व समविचारी संघटनांच्या वतीने आज ( शनिवारी ) निदर्शने करण्यात आली.

यावेळी मारुती भापकर म्हणाले की “ महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच कर्नाटक मधील जनतेने व सरकारांनी सतत महाराष्ट्राचा तिरस्कार केला आहे . या तिरस्काराचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना कर्नाटक मधील काही समाजकंटकांनी केलेली आहे . कर्नाटक मधील भाजपसरकारचाही या समाजकंटकांच्या कृत्याला पाठिंबा असण्याची शक्यता आहे . त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहावे . कर्नाटक सरकारचा आणि या घटनेचा निषेध व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश कर्नाटक सरकारला द्यावेत अशी मागणी करावी .

मानव कांबळे म्हणाले की “ हे हिंदुत्ववाद्यांचे षडयंत्र असून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचे राजकारण केले . त्यांच्या या राजकारणाला विरोध करणारी भूमिका भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना पाठबळ देण्याचे कृत्य कर्नाटक मधील भाजप सरकार करत आहे . हे षड्यंत्र महाराष्ट्रातील शिवराय , फुले , शाहू , आंबेडकर यांच्या विचारांच्या अनुयायांनी व्यवस्थितपणे समजावून घेऊन , अशा प्रवृत्ती भविष्यामध्ये ठेचून काढण्यासाठी संघटित प्रयत्न केले पाहिजेत .

या आंदोलनात यावेळी प्रकाश जाधव , काशीनाथ नखाते , सतिश काळे , धनाजी येळकर पाटील , लक्ष्मण रानवडे , जिवन बोराडे , अविनाश वाघमारे पाटील , दत्ता शिंदे , सागर तापकीर , गणेश सरकटे , सचिन काळभोर , विक्रम पवार, माऊली बोराटे , अनिल राठोड , महेश पंडित , उमेश थोरात , संगमनेश्वर साबळे , गणेश तुरुकमारे , प्रल्हाद कांबळे , धम्मराज साळवे , संतोष शिंदे , मेघा आठवले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this: