क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सांगवी गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

पिंपरी (वास्तव संघर्ष) :सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे गुरव येथे शनिवारी सकाळी एकावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. यातील दोन गोळ्या लागल्याने एक जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना दत्त मंदिर शेजारी पिंपळे गुरव येथे घडली.

याबाबत जितेश रविन्द्र जगताप (वय-25 वर्षे, रा. गांगई पुरम पिपंळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

योगेश जगताप असे गोळ्या लागून मृत्यू झालेल्यांचे नाव आहे.

गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, गणेश बाजीराव ढमाले, अभिजीत बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश ऊर्फ मोनु सपकाळ, अक्षय केंगले, निखील ऊर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन ऊर्फ बबलु रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर (सर्व आरोपी राहणार सांगवी पुणे यातील 3 ते 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास काटेपुरम चौक येथे योगेश जगताप उभे होते. यातील सर्व आरोपींनी संगणमत करुन कट रचुन सांगवी परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतुने जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी गणेश मोटे,अश्विन चव्हाण यांनी मयत योगेश रविंद्र जगताप यास शिवीगाळ करुन `योग्या आत्ता तुला संपवतोच असे मोठयाने ओरडुन शिवीगाळ करून ठार मारण्याच्या उददेश्याने त्याच्या हातातील पिस्तुलाने गोळी मारुन मयत योगेश रविन्द्र जगताप याला गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे. यातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी गणेश मोटेसह अन्य आरोपी फरार आहेत. अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Share this: