बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपयांची अग्रीम मान्यता

पिंपरी (वास्तव संघर्ष) :विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी पिंपरी-चिंचवड पालिकेतील कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपयांचा सण अग्रीममध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपये दिले जात होते आता त्यामध्ये 2 हजार 500 रुपयांची वाढ केली असून यंदा कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये सण अग्रीम मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या स्थायी सर्वसाधारण सभेत प्रशासक आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या 23 ऑक्टोबर 2018 नुसार 12 हजार 500 रुपये सण अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्या निर्णयानुसार पालिकेच्या पात्र कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सण अग्रीम पालिकेकडून मंजूर केले जाते. यंदा

ज्या कर्मचा-यांचे ग्रेड वेतन 4 हजार 800 रुपयांपेक्षा अधिक नाही अशा पात्र कर्मचा – यांना या रक्कमेचा लाभ मिळणार आहे .ज्या कर्मचाऱ्यांची महापालिकेत कमीत कमी सहा महिने सेवा झाली आहे.अग्रिमची परतफेड होईपर्यंत कामावर राहण्याची शक्यता आहे. अशा कर्मचा यांना सण अग्रीम देय राहील . नियमित वेतनश्रेणीत नसलेल्या कर्मचा – यांना नियमित वेतनश्रेणीतील दोन कर्मचारी जामीनदार असणे आवश्यक आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांची संपूर्ण वसुली न झाल्यास संपूर्ण रक्कम वसुली जामीनदार कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुल करण्यात येईल. अग्रीमची वसुली मे 2022 पासून दरमहा 1500 रुपयांप्रमाणे 10 हप्त्यात वसुल करण्यात येणार आहे.अग्रीम अदा करण्यात आलेल्या कर्मचा – यांच्या अग्रीम वसुलीचा हिशोब संबंधित आहारण व वितरण अधिकारी व लेखा विभागाने अद्यायवत ठेवावा , असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

Share this: