पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची वर्णी
पुणे – पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची माळ हाफकीन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. राज्य सरकारने त्यांची आज (दि.17) नियुक्ती केली आहे. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
नवलकिशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे . पुण्याचे जिल्हाधिकारीपद पश्चिम महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते . या पदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि स्पर्धा असते . पुण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविणे आयएएस ‘ अधिकाऱ्यांसाठी नेहमीच प्रतिष्ठेचे राहिले आहे . त्यामुळे या पदावर येण्यासाठी नेहमीच अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असते .