दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी खोटी;अभिनेता रितेश देशमुख यांनी केले ट्विट
पिंपरी – दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याची माहिती समोर आली आहे . अभिनेता रितेश देशमुख याने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे . मात्र , त्यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत .
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता – दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली होती . मात्र अभिनेता रितेश देशमुखनं निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून , तो अजूनही जिवंत आहे . त्यामुळं अफवा पसरवू नका , आपण त्यांची तब्येत लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करूया असे ट्वीट त्याने केले आहे .