बातम्यामनोरंजन जगतमाझं पिंपरी -चिंचवड

‘मिस युज’ नावाचा लघुचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पिंपरी (वास्तव संघर्ष) :एमजेआर एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मनोज मोहन जावीर ” लिखित व निर्मित आणि ” निरंजन चंद्रकांत खंडागळे ” दिग्दर्शित ‘मिस युज’ लघुचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना नवा धाटणीचा लघुचित्रपटाची मेजवानी ठरणार मिळणार आहे.हा चित्रपट प्रेकषकांना रोमान्स, कॉमेडी, सस्पेन्स, भावनीक अश्या विविध बाबींची समेट साधणारा असणार आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार आहे.

चित्रपटामध्ये, मनोज मोहन जावीर व साक्षी निकम यांच्या मुख्य भूमिका असून, यात जहीर पटेल, गणेश दुधाळ,अक्षय मांगलेकर, किरण सोनवणे, विजय मकासरे,कल्पना वानखेडे, मुजफ्फर इनामदार,उज्वला शेडगे,रमेश सारकी,उत्कर्ष गोरे इ.कलाकारांनी साथ केली आहे.दिपा जावळे यांनी मेकअप केले असून , संकलन भूषण राणे यांचे आहे.” युसुफअली शेख ” व ” प्रीतम सिंग सिद्धू पाजी ” यांनी Dop ची ( छायांकन ) ची धुरा सांभाळली आहे.

नवीन वर्ष-2023 पर्वणी घेऊन येणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा व आनंद घ्यावा असे आवाहन चित्रपट निर्माते मनोज जावीर व दिग्दर्शक निरंजन खंडागळे ” यांनी केले आहे तसेच 1 जानेवारी 2023 रोजी सामाजिक कार्यकर्त्या ॲड.सुषमा नामदास यांच्या हस्ते लघुचित्रटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.

Share this: