क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बीएमडब्ल्यू कारसाठी भाजप नगरसेविकेकडून सुनेचा छळ;दिराकडून वारंवार घरात विनयभंग

File Photo

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील भाजप नगसेविकेवर सुनेच्या छळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी पैसे दिले नाहीत आणि बीएमडब्ल्यू गाडीची मागणी करून, विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी भाजप नगरसेविकेसह पती, दीर आणि सासूच्या भावावर सांगवी पोलिस ठाण्यात विवाहितेचा छळ, तर दीरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ वर्षीय सुनेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडितेचे आणि नगरसेविकेच्या मुलाचे २०१६ मध्ये लग्न झाले आहे. पीडितेच्या सासरच्यांकडून वारंवार बीएमडब्ल्यू कार मागणी करण्यात येत होती तसेच लग्नानंतर निवडणुकीसाठी पैसे दिले नाहीत; म्हणून ‘तुझी घरात राहायची लायकी नाही,’ असे म्हणत छळ केला गेला. दिराने वारंवार घरात विनयभंग केल्याचे सुनेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

Share this: