जागतिक बातम्याबातम्यामहाराष्ट्र

विजयस्तंभ शौर्यदिन आंबेडकरी अनुयायांकडून मोठ्या उत्साहात साजरा

पुणे (वास्तव संघर्ष): भिमा कोरेगाव इथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते.यावेळी 500 महार शुर सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना लढाईत पराभूत केले होते. हे युद्ध जिंकल्यानंतर  महार सैनिकांच्या स्मरणार्थ  भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ बांधण्यात आला आहे.

आज या विजयस्तंभास 205 वर्षे पूर्ण होत असून सर्व भारतीय या दिवसाला शौर्य दिन म्हणून साजरा करतात. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर  भीमा कोरेगाव विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी आज अलोट जनसागर आला आहे. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ,वंचीत अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना दिली.

या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आले. पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. 205 वर्षांपुर्वी भीमा याठिकाणी  झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता.

1 जानेवारी 1927 ला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.दरवर्षी भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन आंबेडकरी अनुयायांकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रासह  देशभरातून आंबेडकर अनुयायी यांच्यासह इतरही लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात.

Share this: