बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘एक काॅल.. प्रोब्लेम साॅल ‘ सोशलमिडीयावरील एका पोस्टमुळे वडीलांचे छञ हरवलेल्या मुलींना मिळाली आर्थिक मदत

पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवडच्या सरीमधील एका रिक्षाचालक कुटुंबप्रमुख कै.एकनाथ राठोड यांचे एप्रिल महिण्यात कोरोनामुळे दु:खद निधन झाले. त्यांना तेजस्विनी व ऋतुजा या दोन मुली व गणराज मुलगा आहे. तेजस्विनी ही इंजीनीयरच्या शेवटच्या वर्षाला, ऋतुजा ही बारावीत शिकत आहे तर गणराज हा आठवीत शिकत आहे. वडीलांचे आकस्मितपणे निधन झाल्यामुळे या मुलांच्या डोक्यावरील वडीलांचे छञ हरवल्याने राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या मुलांना शिक्षणाबरोबरच उदरनिर्वाहाची फार मोठी गरज निर्माण झाली आहे.

सदर घटना हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे संस्थापक कैलास दुधाळे यांच्या माध्यमातुन सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर राजगुरुनगरचे सामाजिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक श्री.संदीप जाधव सर यांनी या घटनेची माहीती भोसरीमधील श्रीराम विद्या मंदिर भोसरी या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.लालासाहेब जगदाळे सर यांना कळवली. जगदाळे सरांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली. आणि आणि एकाच काॅलवर या मुलींचे प्रोब्लेम साॅल झाला आहे.
या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षक मित्र परीवार भोसरी, स्वाधार सामाजिक संस्था तसेच जिव्हाळा परिवार भोसरी यांच्यावतीने तातडीची आर्थिक मदत म्हणुन 13000 रुपयांचा धनादेश तेजस्विनी राठोड यांच्याकडे सुपुर्द केला तसेच 4 महिने पुरेल एवढी किराणा स्वरुपातील मदत देखील केली व पुढील शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठी मदत देण्यासाठी तयारी दर्शवली.

तसेच सोशल मिडीयावरील सदर घटना सामाजिक कार्यकर्ते श्री.गौतम डावखर यांनी राजर्षी शाहु महाराज सोशल फाऊंडेशन चे संयोजक श्री.कैलासराव वडघुले यांस सांगितली त्यांनी देखील सदर घटनेची चौकशी करुन राठोड कुटुंबातील दोन मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 3000 प्रत्येकी असा 6000 रुपयांचा धनादेश तेजस्विनी व ऋतुजा राठोड यांच्याकडे सुपुर्द केला. हि शिष्यवृत्ती या मुलींचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत देण्यात येणार आहे.

राठोड कुटुंब राहत असलेल्या भोसरी प्रभागातील स्थानिक नगरसेवक रविभाऊ लांडगे यांच्यावतीने रोख 4000 रुपयांची मदत राठोड कुटुंबासाठी करण्यात आली.माणुसकीच्या नात्यातुन अतिशय बिकट अवस्थेत आर्थिक मदत केल्याबद्दल राठोड कुटुंबियांच्यावतीने सर्वांचे मनापासुन आभार व्यक्त करण्यात आले ..

Share this: