क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वाकड(वास्तव संघर्ष): सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस नाईक यानी कसाई व दोन साथी वासरू चोरून नेताना रंगे हाथ पकड़ले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.ही घटना बीआरटी रोड रावेत येथे रविवार (दि.1) पहाटे झाली आहे.

आयफाद कुरेशी (रा. चिंचवड), ह्रासद कुरेशी (रा.पिंपरी) तसेच रिक्षा चालक कादर सैय्यद याना पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवार (दि.1)रोजी पहाटे रावेत परिसरातील बीआरटी रोड मध्ये गाईच्या तस्करींची धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. तीन आरोपी एका ऑटो रिक्षामध्ये गोवंश तस्करी करताना पोलिसांनी रंगेहात पकडला आहे. पोलीस कर्मचारी अमोल खुडे हे कर्तव्यावर नसताना देखील त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडलं आहे. अमोल खुडे  रावेत येथील बी आर टी रोड मधून जात असताना त्यांना एका ऑटो रिक्षामध्ये संशयास्पद हालचाल दिसली.  त्यानंतर त्यांनी ती आटो रिक्षा थांबवून ऑटो रिक्षातील तरुणांकडे चौकशी केली. 

त्यादरम्यान त्याला ऑटो रिक्षामध्ये गाईच्या दोन – तीन वासरूंची तस्करी होताना दिसलं. ऑटो रिक्षामध्ये प्रवास करणारे तीन तरुण गाईंच्या कत्तलीसाठी गाईंच्या वासरूची तस्करी करत असल्यास धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर अमोल खुडे यांनी रावेत पोलिसांना संपर्क साधत ऑटो रिक्षातील तीन आरोपी तरुण आणि गाईंच्या वासरूंना रावेत पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर आता रावेत पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत

Share this: