सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक, राष्ट्रवादीची ४० जणांची यादी जाहीर
मुंबई (वास्तव संघर्ष) लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीने आपल्या प्रचारसभेसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रा. सुषमा अंधारे यांच्या नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह अनेक आमदारांची नावे स्टार प्रचारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
आंबेडकरी विचारांची तोफ समजल्या जाणाऱ्या आक्रमक प्रा. सुषमा अंधारे याची संपुर्ण महाराष्ट्रात ख्याति असून तसेच त्यांना स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने घोषित केल्याने आंबेडकरी मतदान राष्ट्रवादीला मिळू शकते. निवडणूकीत पक्षाची आक्रमक भूमिका मांडण्यासाठी व विरोधकाला सळो की पळो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ताधारी शिवसेना – भाजप यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यासाठी असेच ४० स्टार प्रचारक नेमले आहेत.
यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, सुनील तटकरे, शंकरसिंह वाघेला, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, भास्कर जाधव, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर, मधुकर पिचड, अरुण गुजराथी, अण्णा डांगे, हसन मुश्रीफ, डॉ. अमोल कोल्हे, दिलीप सोपल, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, नवाब मलिक, फौजिया खान, धीरज शर्मा, शब्बीर विद्रोही, अब्दुल मजीज मेनन, अनिल देशमुख, प्रकाश गजभिये, वर्षा पटेल, सुषमा अंधारे, चित्रा वाघ, जयदेव गायकवाड, गफर मलिक, ईश्वर बालबुद्धे, प्रदीप सोळुंके, सक्षना सलगर, जयंत पटेल यांचा समावेश आहे.