बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबादमध्ये रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या मजुरांना प्रत्येकी 20 लाखांची मदत द्यावी – रामदास आठवले

वास्तव संघर्ष आॅनलाईन.. मुंबई दि. 8 – औरंगाबाद मध्ये करमाड येथे रेल्वे रुळांवर मालगाडीने अपघात होऊन 16 मजुरांचा करूण अंत झाला.या रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या मूळ मध्यप्रदेशातील असलेल्या या मजुरांच्या कुटुंबियांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 5 लाख रुपये सांत्वन निधी जाहीर केला आहे.मात्र या अपघाताची चौकशी व्हावी अशी आमची मागणी असून मृत्यू पावलेल्या या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एकूण 20 लाख रुपयांची मदत शासनाने करावी. त्यात मध्यप्रदेश सरकारने 10 लाख आणि महाराष्ट्र्र सरकार 10 लाख रुपये मदत द्यावी. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

जालना येथे कामाला असलेले हे मजूर मूळ मध्यप्रदेशातील होते. त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर आर्थिक मदत देण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मी पत्र पाठवीत असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी दिली आहे.

जालना येथून पायी चालत चालत मध्य प्रदेशाला आपल्या घरी जाणाऱ्या या निरपराध मजुरांचा रेल्वे रुळांवर मालगाडीखाली चिरडून अत्यंत करुण अंत झाला असून मयत सर्व मजुरांना रिपाइं तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली ना रामदास आठवले यांनी अर्पण केली आहे.

Share this: