बातम्यामहाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात बसपाने उमेदवार दिल्यास मी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन – आनंद चंदनशिवे

सोलापूर (वास्तव संघर्ष) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत. ज्या विचारधारेतून बहुजन समाज पक्ष उभा राहिला, त्याच घराण्यातील व्यक्तीच्या विरोधात बहुजन समाज पार्टी उमेदवार देत असतील तर ते योग्य राहणार नाही. त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात येऊ नये, यासाठी प्रभारी महासचिव अ‍ॅड. संजीव सदाफुले यांना विनंती पत्र देणार असून, जर भूमिका बदलली नाही तर मी पक्षाचा व प्रसंगी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन, अशी आक्रमक भूमिका आनंद चंदनशिवे यांनी जाहीर केली आहे..

दरम्यान, राहुल सरवदे यांनी बसपातर्फे सोलापूर लोकसभेसाठी मंगळवारी दुपारी अर्ज भरला.चंदनशिवे पुढे म्हणाले की, १९५२ सालच्या स्वतंत्र भारतातील पहिल्याच निवडणुकीत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. कोणत्याही परिस्थीतीत बाबासाहेब हे संसदेत जाऊ नये म्हणुन, काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार उभा करून त्यांचा पराभव केला होता. हा पराभव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा, अन्यथा आंबेडकर या नावाच्या विरोधात जाणे मला तरी शक्य होणार नाही. असे झाल्यास मी पक्षाचा राजीनामा देईन त्यापुढे माझे नगरसेवकपदही सोडायला तयार आहे असे आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.

Share this: