क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

विवाहीतेच्या नावावर असलेली 11 गुंठे जागा आणि फ्लॅट विकण्यासाठी सासरच्या मंडळीनी केली मारहाण ;भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) – भोसरी येथील विवाहितेच्या नावावर असलेली 11 गुंठे जागा आणि फ्लॅट विकण्यासाठीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी सासरच्या मंडळींनी दबाव टाकला . विवाहीतेला शारिरीक आणि मानसिक त्रास देत लाथाबुक्यांनी मारहाण केली . तसेच जीवे मारण्याची धमकी दिली . याप्रकरणी सासरच्या आठ जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या

प्रकरणी 38 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

निशिकांत नामदेव पवार ( वय 401 . कांताबाई नामदेव पवार ( वय 60 ) , नामदेव तुकाराम पवार ( वय 65 ) , संतोष नामदेव पवार ( वय 36 ) , सारिका संतोष पवार ( वय 30 ) , आशा काळे ( वय 50 ) , तात्या जगदाळे ( वय 55 ) , अमर उर्फ भोया धावडे ( वय 25 , सर्व रा . सुखदेव नारायण मार्ग , भोसरी ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांच्या मालकीची 11 गुंठे जागा आणि तळेगाव येथे फ्लॅट आहे . ही जागा आणि फ्लॅट विकण्यासाठी आरोपींनी त्यांना कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला . मात्र , फिर्यादी यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने त्यांचा 2011 ते 24 एप्रिल 2020 या कालावधीत वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ केला . त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली . मारण्याची धमकी दिली . भोसरी ठाण्याचे फौजदार तलवाडे अधिक तपास करत आहेत .

Share this: