बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत गणेश आहेर यांचे माणूसकीचे दर्शन; मृतांच्याअत्यंसंस्कारासाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर देतात हार फुले

दिपक साबळे..!

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये शहरात आज एकूण चार रूग्णांचा बळी कोरोनाने घेतला आहे. कोरोना सारख्या महाभयानक आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना आणि इतर आजाराने निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना हार फुले आणि मयतीचे साहीत्य मिळताना दिसत नाही. यामुळे अनेक मृत नातेवाईक ञस्त झाले आहेत.

माञ तळागळात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश आहेर यांनी ना नफा ना तोटा या अटीवर ह्या होणार्या अंत्यविधीसाठी लागणारे हार फूले तूळशीचे पाने आपल्या राहत्या घरी नखाते वस्ती रहाटणी येथे बोलवून लोकांना उपलब्ध करून देण्याच काम सातत्याने सूरू ठेवले आहे.त्यांच्या या माणुसकीच्या दर्शनामुळे शहरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, लाॅकडाऊन सूरू झाल्यापासून शेकडो लोकांना हार फूले तूळशीचे पाने अंत्यविधी साठी गणेश आहेर यांनी उपलब्ध करून दिले आहेत. व पूढे देखील हि सेवा कायम ठेवणार असल्याचं गणेश आहेर यांनी संगितल.

Share this: