क्राईम बातम्याबातम्यामनोरंजन जगतमहाराष्ट्र

असल्या छोट्या, तुच्छ आणि निच जातीच्या लोकांसोबत मी ….बिगबॉसमध्ये जातीवाद

मुंबई (वास्तव संघर्ष): बिगबॉस हा हिंदी टेलिव्हिजन शो अनेक कारणांसाठी सतत चर्चेचा विषय ठरत असतो. नुकताच बिग बॉस मधील एका एपिसोडमध्ये एका कालाकाराने दुसऱ्या कलाकाराला जातीवरून डिवचल्याचे प्रकरण समोर आले आहे.एकविसाव्या शतकात देखील जातीवाद कसा फोफावत आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे.

झाले असे की, विकास मनकट याने शो मधील सह कलाकार अर्चना गौतम हिला म्हटले “हीची लायकी आणि हीची लेवल ज्याप्रमाणे आहे की ,असल्या छोट्या, तुच्छ आणि निच जातीच्या लोकांसोबत मी बोलत नाही,कारण हे लोकं घाण विचारांचे असतात… तर या वाक्यावर त्यातीलच एक स्पर्धक शालीन भनौट म्हणाला ‘मी तर उद्या हीचे गंगाजलने शुद्धिकरण करेन..

असे म्हटल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने बिग बॉसच्या निर्मात्यांना थेट नोटीस बजावत या प्रकरणी सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. बरोबरच या प्रकरणी केलेल्या कारवाईचीही महिती देण्यास सांगितले आहे.

Share this: