क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक :महिलेचे नग्न फोटो सोशलमिडीयावर व्हायरल करण्याची धमकी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : आपले हात उसने पैसे परत मागण्यांसाठी गेलेल्या महिलेला ‘तुझे नग्न फोटो सोशलमिडीयावर वायरल करण्याची धमकी देवुन विनयभंग करण्यात आला आहे. ही घटना 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मोरवाडी पिंपरी कोर्ट समोर घडली होती.

याबाबत पिडीत महिलेने अर्ज केल्यानंतर मंगळवारी (दि.5) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिरोज शब्बीर सय्यद, समीर मुलानी (दोघे रा. नम्रता हौसिंग सोसायटी यमुनानगर निगडी) एक अनोळखी इसम ( नाव व पत्ता माहीत नाही. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेने आरोपींना हात उसने कराराने वीस लाख पन्नास हजार रुपये परत करण्यासाठी सांगितले असता यातील आरोपी फिरोज याने चिडुन जावुन “साली तेरे नंगे फोटो बनाकर सोशल मिडीया अकाऊंट पे डालुंगा साली किसीको मुह दिखाने के काबिल नही छोडुंगा “असे बोलुन एका हाताने पिडीत महीलेचे केस धरुन दुस-या हाताने उजव्या बाजुची छाती जोरात दाबली तसेच आरोपी समीर याने पाठीमागे वळुन ड्रायव्हर व पुढील सिट मधील मोकळया जागेमधुन मागे वळुन दोन्ही हाताने पिडीत महिलेचे दोन्ही पाय दाबुन धरले त्यावेळी पिडीत महीलेने जोरजोरात आरडा ओरडा करु लागल्याने लोक जमा झाले. त्यानंतर पिडीत महिलेने स्वःताची सुटका करून गाडीतून बाहेर आल्या. याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. पी. बोबडे करित आहेत.

Share this: