घरकुल येथे दिव्यांगांचा आंतरजातीय विवाह मोठ्या उत्साहाने साजरा ;महापौर माई ढोरे उपस्थित
चिखली (वास्तव संघर्ष) : दिव्यांगांची सेवा हीच श्रेष्ठ मानवसेवा असुन समाजाने दिव्यांगाप्रती असलेली जबाबदारी निस्पृहपणे पार पाडावी असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
झुंज दिव्यांग संस्थेच्या वतीने चिखली येथे दिव्यांग व्यक्तींच्या आंतरजातीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आज सोमवार (दि.20) रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी उपस्थित राहुन नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. या विवाह सोहळ्यामध्ये सहा विवाह संपन्न झाले.
यावेळी झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजु हिरवे, भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, पालिकेचे दिव्यांग सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन नगरसेविका योगिताताई नागरगोजे, सद्गुरु सेवा प्रतिष्ठानचे सचिन म्हसे, सामाजिक कार्यकर्ते गणेश शेठ बाफना, शिवरुद्र प्रतिष्ठान घरकुल,उद्योजक महेश अग्रवाल, पञकार दिपक साबळे, झुंज दिव्यांग संस्थेच्या महिला अध्यक्ष नुतन रोहमारे, कार्याध्यक्ष राजेश दिवटे सहकारी अध्यक्ष नवनाथ भाऊ निंबाळकर, दादासाहेब काशीद, ओमलंग घोणे, अमोल मोरे, गणेश रोहमारे, संतोष राजिवडे, बाळासाहेब सपकाळ व विविध मान्यवर आणि दिव्यांग दाम्पत्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या विविध योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन देखील महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी केले.या विवाह सोहळ्यात पाच दिव्यांग नवदांपत्त्यांचा विवाह संपन्न झाला. सर्व नवदांपत्यांना पूर्ण पोशाख सर्व संसारोपयोगी साहित्य संस्थेमार्फत देण्यात आले. हा सोहळा सनई चौघडे रथ व वाद्यवृंदा सहित संपन्न झाला.