क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून विविध समस्या सोडविण्यावर माझा भर असेल – पोलीस आयुक्त, कृष्णप्रकाश

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहराची ओळख अतिशय सुसंस्कृत शहर म्हणून आहे. कष्टकरी कामगारामुळे कामगार नगरी म्हणून ओळखले जाणारे पिंपरी चिंचवड काही निवडक गुन्हेगारामुळे बदनाम झाले आहे.  असे लोक माथाडीमध्ये असू शकतात, सायबर गुन्हे करणारे असू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून गुन्हे करीत आपला प्रभाव निर्माण करणारे असू शकतात. दिशाहीनतेमुळे काही बाल गुन्हेगार असू असतात. या सर्वांना आधी समजावण्याचा प्रयत्न करणार. तरीही ते गुन्हे करीत राहिले तर मग कारवाई करणार, असा इशारा पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज शनिवारी आयोजित आपल्या पहिल्या पञकार परिषदेत दिला आहे.

यावेळी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर सुनियोजित शहर आहे. या शहरात 99 टक्के लोक कायदा पाळणारे व त्याचा आदर करणारे आहेत एक टक्का लोक गुन्हेगारी डिझाईन किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे आहेत.  त्यांचा बीमोड करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिन.

सुरुवातीला शहरातील गोष्टींचे अध्ययन करावे लागेल.  येथील समस्या समजून घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याचे कृष्णप्रकाश म्हणाले.राजकीय दबावाबद्दल बोलताना आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले ‘मला कोणत्याही दबावाखाली येण्याची सवय नाही. जे योग्य आहे, कायद्याला धरून आहे ते विनम्रतापूर्वक करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन.तसेच सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून विविध समस्या सोडविण्यावर माझा भर असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शहरात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांनी कारवाईचा इशारा दिला. कायदा सर्वांसाठी सारखा असेल त्यात लहान मोठा असा भेदभाव केला जाणार नसल्याचेही ते म्हणाले.प्रत्येक ठिकाणी वेगळी कार्यपद्धती असते.  शहराचे अध्ययन केल्यानंतर मी माझी कार्यपद्धती निश्चित करेन असे कृष्णप्रकाश यांनी सांगितले.

नागरिकांना अत्यावश्यक प्रसंगात गरज भासल्यास त्यांनी थेट आपला 8805081111 नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन  केले आहे. मात्र, इतर वेळी संदेश पाठवून आपली समस्या सांगावी, असे ते म्हणाले.

Share this: