क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज पदभार स्वीकारला

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडचे मावळते पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून आज नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज पदभार स्वीकारला . गृहविभागाने 25 अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत . यामध्ये पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तपदी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

पुणे आणि पिंपरी – चिंचवड या दोन शहरांमधील वाढती गुन्हेगारी , राजकीय घडामोडी , पिंपरी – चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहत याचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयावर ताण येत होता . त्यामुळे पुणे शहर आयुक्तालयातील आणि पुणे ग्रामीण मधील काही पोलीस स्टेशन मिळून पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली . 28 मे 2018 रोजी याबाबतचे आदेश देण्यात आले होते .

Share this: