निगडीत तरूणावर तलवार, कोयते आणि पालघनने प्राणघातक हल्ला;सात जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पूर्वीच्या वादातून सात जणांच्या टोळक्याने तरूणावर लोखंडी तलवार आणि कोयत्याने वार करून हल्ला चढवला निगडीतील ओटास्कीम येथील राजनगर येथे ( बुधवारी दि, २ ) रोजी रात्री हा प्रकार घडला या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
या प्रकरणी हरनामसिंग कांचनसिंग जुन्नी ( वय २१ वर्षे राहणार राजनगर, निगडी ) यांनी फिर्याद दिली आहे.
जाकीर ऊर्फ डॅन्या पठाण ( वय २१ वर्षे ), मुन्या शेख ( वय २१ वर्षे ) आणि सचिन ऊर्फ सच्या जाधव ( वय १९ वर्षे ) तिघे राहणार राहूल नगर निगडी , रूतिक सकट ( वय २० वर्षे राहणार दळवी नगर , निगडी ) बबल्या रणदिवे ( वय २२ वर्षे राहणार गुरूदत्त हौ, सोसायटी दळवी नगर निगडी ) अजय नाटेकर ( वय १९ वर्षे राहणार संजय नगर निगडी ) आणि भावेश ऊर्फ भाव्या बाविस्कर ( वय १८ वर्षे राहणार , ओटास्कीम निगडी ) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुन्नी व वरिल संशयित आरोपींचे पूर्वी भांडणे आहेत. या वादातून बुधवारी वरील सात जणांनी त्याला एकट्याला गाठले त्यानंतर लोखंडी कोयता, तलवार, पालघनच्या साहयाने फिर्यादी व त्याचे मित्र सातलिंग संगोळगी आणि मारूती धोत्रे या दोघांवर वार केले. या प्रकरणी एका संशयितांना अटक केली आहे. यापूर्वी काही गुन्हे आहेत का त्याची चौकशी सुरू असल्याची माहीती पोलिस उपनिरिक्षक संदीप ओहोळ यांनी दिली.