बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

हाथरस अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरीत ‘मशाल महारॅली’ ;सर्व पक्षीय नेत्यांचा रॅलीत सहभाग

पिंपरी (वास्तव संघर्ष) उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मनिषा वाल्मिकी हिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये सर्वपक्षीय मशाल रॅली काढून निषेध आंदोलन काढण्यात आले. पिंपरीतील महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यापासून रैलीला सुरुवात झाली.

सर्व पक्षांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते , काँग्रेस, शिवसेना, मनसे, वंचित बहूजन आघाडी , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन मोर्चा आदी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी आणि बहुसंख्य नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेतला .

यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील ,माजी आमदार अॅड . गौतम चाबुकस्वार , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील , काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे , शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर , शिवसेना गटनेते राहुल कलाटे , मनसे गटनेते सचिन चिखले , नगरसेवक अनिल गावडे , पुण्याचे माजी नगरसेवक राजू परदेशी तसेच रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहूल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, आरपीआय शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, रिपब्लिकन एम्प्लॉईजचे विनोद चांदमारे, अमोल डंबाळे , अनिता साळवे , आधार संघटनेचे अध्यक्ष दलजित सिंह , वंचित बहुजन आघाडीचे गुलाब पानपाटील, भाऊसाहेब अडागळे , मोहन बिडलान , अनिल पारचा , रोहदास वाल्मिकी , संदिपान झोंबाडे , प्रमोद क्षिरसागर , गोपाळ मोरे , अजय लोंढे , सतिश ओव्हाळ , विजय सौदे , सर्वजीत बनसोडे , मकरध्वज यादव , भारत मिरपगारे , विशाल कसबे , शरद वाघमारे , अनिल चव्हाण , अजय कांबळे , ईश्वर कांबळे आदींसह अनेक महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या .

Share this: