क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र शाळेसमोर फॉर्च्यूनर गाडी अंगावर घालून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न ;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र शाळेसमोर फॉर्म्युनर गाडी अंगावर घालून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यानुसार पिंपरी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तानाजी एकनाथ थोरात ( वय ५४ वर्षे , रा सुंदरम बिल्डींग नं ३०४ नवमहाराष्ट्र शाळेमागे पिंपरी गाव , पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सतेश एकनाथ नानेकर ( रा . सुंदरम बिल्डींग , प्लॅट नं ४०७ , पिंपरी , पुणे . सध्या रा .महालक्ष्मी मंदिरासमोर , शिवाजी पुतळ्या जवळ , पिपंरी गाव , पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील भिकु वाघेरे पुतळ्या समोर , नव महाराष्ट्रशाळे जवळ तानाजी थोरात हे काम करत असलेल्या टाटा कंपनी येथे जाण्यासाठी कंपनीची बस ज्या बस स्टॉप वर थांबते त्या नवमहाराष्ट्र शाळेसमोरील बस स्टॉप कडे पायी चालले असताना आरोपी सतेश एकनाथ नानेकर याने तानाजी थोरात यांना व्याजाने दिलेले ३०,००० / – रुपये दिले होते. त्या व्याजाच्या पैशाच्या कारणावरुन सतेश नाणेकर याने तानाजी थोरात यांना शिवीगाळ करुन हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती तसेच तानाजी थोरात यांच्या पत्नीला देखील अश्लिल बोलला होता .

त्यामुळे तानाजी थोरात यांनी सतेश नानेकर विरुध्द पिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने त्याचा राग मनात धरुन सतेश नाणेकर याने त्याचे ताब्यातील पांढ – या रंगाची फॉर्म्युनर सारखी दिसणारी चार चाकी कार नं एम.एच.१४.एच.सी .२८२० हि गाडी मुद्दाम तानाजी थोरात यांना जिवे मारण्याचे उद्देशाने भरधाव वेगात चालवुन थोरात यांना ठोकर देवुन त्यात जबर जखमी करुन तानाजी थोरात यांच्या डाव्या मांडीचे हाड मोडुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: