क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील खराळवाडीत एकाला मारहाण करीत लुटले ;दोन आरोपींना पिंपरी पोलीसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरीतील खराळवाडी बस स्टॉपजवळील , कॅनरा बँकेच्या ए टी एम समोर दोघांजणांनी एका व्यक्तीला मारहाण करून जखमी केले तसेच त्याच्याकडून सॅमसंग मोबाईल फोन हिसकावून चोरी केला आहे. ही घटना शनिवारी दि. 5 सकाळी 8 च्या सुमारास घडली असून दोन्ही आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अशोक गोपालराव डहाळे ( वय -५८ , रा. फ्लॅट नं १०५ , सोना रुपा को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी खराळवाडी , पिंपरी , पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोसीन समीर सय्यद( रा . पापय्याचाळ खराळवाडी , पिंपरी पुणे) शुभम अमर नरिया (रा . कांबळे बिल्डींग भागवत गीता मंदिराजवळ , खराळवाडी , पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०५ / ० ९ / २०२० रोजी 8 वाजताच्या सुमारास खराळवाडी बस स्टॉपजवळील , कॅनरा बँकेच्या ए टी एम समोर , खराळवाडी , पिंपरी , पुणे .यातील आरोपी यांनी आपआपसात संगणमत करुन आरोपी मोसिन शेख याने चाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताला मनगटाजवळ अंगठयावर मारुन जखमी करुन फिर्यादीच्या डाव्या खिशातील ५,००० / – रुपये किंमतीचा चा एक काळया रंगाचा सॅमसंग गॅलक्सी एम -१० कंपनीचा मोबाईल , त्याचा आय एम ई आय नंबर ३५ ९ ३१८ / १० / १२८६०५ / ५ | ५ ९ ३१ ९ / १० / १२८६०५ / ३ असे असुन त्यामध्ये एअरटेल कंपनीचे ९ ८ ९ ०११६०१ ९ नंबरचे सीमकार्ड असलेला मोबाईल जबरदस्तीने काढून आरोपी शुभम नारिया याचे पॅशन गाडी नंबर एम एच १४ जी बी ९ ३६२ वरुन निघून गेले अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: