क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘त्या’ पत्रकारांवर खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल

देहूरोड (वास्तव संघर्ष) : देहुरोड पोलीस ठाणे हद्दीत बोगस पत्रकारांवर सलग दोन खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, या दोन्ही प्रकरणातील आरोपींना दोन वेगवेगळे पोलिस अधिकारी तपास करत असूनही अद्यापपर्यंत अटकेची कारवाई झालेली नाही.

शनिवार (दि.3) रोजी या आरोपींवर खंडणी उकळणे, धमकावणे आणि विनयभंगासारखा गुंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आरोपी श्रीजीत रमेशन, मंगेश पोडाला, आनिस शेख, राजेश सपरे, समीर शेख आणि अ‍ॅडम या सहा जणांवर दाखल आहे. देहूरोड आदर्शनगर भागातील साई सुपर मार्केटमध्ये दुकानाची मालकीण नसताना दुकानाचे फोटो काढून आरोपींनी 2 हजारांचा हफ्ता चालू करण्याची मागणी केली होती. तसेच पोलिसात तक्रार केल्यास मालकीणीच्या पतीला जिवे मारण्याची धमकी देखील दिली. तसेच तात्पुरते दुकानातील 1 हजारांची रक्कम घेऊन ते निघून गेले. त्यानंतर पुन्हा येऊन महिलेकडे 2 हजारांचा हफ्ता सुरु करण्यासाठी धमकावले.

पण महिलेकडे पैसे नसल्याने तिने पैसे दिले नाहीत. यावर आरोपींनी काढलेल्या फोटो आणि व्हिडिओच्या आधारे त्यांची देखील खोटी बातमी तयार करुन “ब्रेकिंग न्युज” या माध्यमातून ती व्हायरल केली. यामुळे महिलेची प्रतिष्ठा मलीन झाली. तसेच महिलेला “तुम कुछ बुरी नही हो” असे बोलून विनयभंग करत मोठ्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने देहूरोड पोलीसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. मात्र चार दिवस उलटून देखील पोलिसांनी कठोर पावले उचललेली दिसत नाहीत.

या  प्रकरणाचा तपास सध्या देहुरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे यांच्याकडे आहे. या  प्रकरणात गुन्हा दाखल होऊन चार ते पाच दिवस उलटून गेले तरी देखील फक्त मंगेश पोडाला नावाच्या या एकाच आरोपीला अटक झाली आहे. तर इतर पाच ते सहा जण अद्यापही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे आरोपी वारंवार असे गुन्हे करतात त्यांची पार्श्वभूमीच गुन्हेगारी स्वरुपाची आहे. यातील आनिस शेख याला तर घरात कत्तलखाना चालवणे आणि राज्यात प्रतिबंधित असलेले गो मास विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पत्रकार असल्याचे सांगून असे अनेक गुन्हे या महाठगांनी यापूर्वी देखील केल्याचा संशय आहे

Share this: