बूट फेकून दिल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करत मारहाण
पिंपरी(वास्तव संघर्ष ) : बूट फेकून दिल्याच्या कारणावरून दोघांनी एका महिलेला शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी मुली सोबत आलेल्या महिलेला दगडाने मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री आठ वाजताच्या सुमारास बौद्धनगर पिंपरी येथे घडली..
अनितादेवी सुरेंद्र राम यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुनील राम (वय 30), गुड्डू राम (वय 22, दोघे रा. बौद्धनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांनी आरोपींचे बूट फेकून दिले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी रात्री फिर्यादी आणि त्यांची मुलगी आरोपीकडे गेल्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत