डोक्यात दगड मारुन खून करणाऱ्या आरोपीला अटक
चाकण (वास्तव संघर्ष) : किरकोळ कारणावरून मित्रानेच मित्राच्या भररस्त्यात डोक्यात दगड मारुन खून केला. ही घटना गुरुवारी (दि.19) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. 4 तासात आरोपीला गजाआड करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश मिळाले आहे.
दीपक काशीराम राठोड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस शिपाई बाळकृष्ण पाटोळे यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विठ्ठल मंगेश चव्हाण (वय 22, रा. महाळुंगे, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व मयत हे म्हाळुंगे येथे एकत्र रुमवर रहात होते. गुरुवारी रात्री दोघांनी सोबत दारु पिले व ते दोघे जेवणासाठी चायनीज सेंटवर गेले. तिथे दोघात किरकोळ कारणावरून वाद झाले. ज्यामध्ये आरोपीने दीपक याला खाली पाडून रस्त्यावरील दगड त्याच्या डोक्यात मारून त्याचा खून केला.
खूनानंतर पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. तिथे आसपासाच्या नागरिकांची चौकशी केल्यानंतर मयताची ओळख पटली. दरम्यार आरोपी हा त्याच्या मूळगावी म्हणजे नांदेडला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केली असता त्याला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.