क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक: मावस भावानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शिरगाव (वास्तव संघर्ष): मावस भावानेच आपल्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून तिला दोन महिन्यांची गरोदर केली आहे. ही घटना ऑक्टोबर 2022 ते 22 जानेवारी 2023 दरम्यान घडली आहे.

याबाबत पिडीत फिर्यादी मुलीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अभिषेक पप्पू वर्मा (वय-18,रा. शिरगाव ता.मावळ, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीची आई पवना हॉस्पिटल सोमाटणे फाटा येथे कामावर गेल्यानंतर फिर्यादी घरात एकटीच असताना फिर्यादी यांचा मावस भाऊ आरोपी अभिषेक वर्मा हा फिर्यादी ही अल्पवयीन आहे. हे माहीत असून सुद्धा घरात येऊन फिर्यादीचे इच्छेविरुद्ध फिर्यादी सोबत वारंवार शारीरिक संबंध करून फिर्यादीस दोन महिन्यांची गरोदर ( प्रेग्नेंट) केली आहे.

अभिषेक वर्मा या आरोपीवर पोलीसांनी कलम 376, लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4,5 (एल) (एन), 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिरगाव पोलीस स्टेशनचे पो .उप.निरिक्षक येडे करित आहेत.

Share this: