बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

जेष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे निधन

पिंपरी (वास्तव संघर्ष): जेष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे वयाच्या 66 वर्षी आज सोमवार (दि.23) रोजी दिर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. विजय भोसले हे दैनिक केसरीचे पिंपरी-चिंचवडचे आवृत्ती प्रमुख असून मागील 42 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. त्यांचे मुंबई अधिवेशन, नागपूर अधिवेशन वार्तांकन महाराष्ट्रात मोठ्या आवडीने वाचले जाते.

ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात लाखो नियमित वाचक आहेत. भोसले यांनी एलआयसीच्या आयपीओ बाबत केलेले वृत्तांकन लाखो लोकांनी वाचले.मराठी पत्रकार क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्यासाठी ते एक चालते बोलते व्यासपीठ समजले जात होते.

प्रसारमध्यमातील अनेक पत्रकार त्यांचे मार्गदर्शन घेत असत. मंत्रालय, विधिमंडळ प्रतिनिधी म्हणून ते गेली 32 वर्षे नियमित काम करीत होते.शहरातील, राज्यातील राजकारण, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचा सखोल अभ्यास असून त्या विरोधी त्यांनी केलेले लिखाण राज्यभर गाजले आहे. जेष्ठ पत्रकार विजय भोसले यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड मधील पत्रकार क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

Share this: