बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

छञपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची निविदा वादाच्या भोवर्‍यात ;वादग्रस्त ठेकेदाराला काम देण्यास विरोध

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड येथील मोशी येथ3 बो-हाडेवाडी विनायक नगर येथे छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्याच्या कामासाठी बुधवार दिनांक ०३/०६/२०२० रोजी स्थायी समितीत झालेल्या सभेत ३२ कोटी ८४ लाख ७५ हजार रूपयाला मंजूरी देण्यात आली आहे. हे काम मे.धनेश्वर कन्स्ट्रक्शनला देण्यात आले माञ में.धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने भोसरी शितलबाग येथील पादचारी पुल ७५ लाखावरून साडेसात कोटी रूपयापर्यंत केला होता .त्यामुळे शितलबागेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केल्याने संबधित ठेकेदार वादग्रस्त ठरला होता. हा ठेकेदार या कामातही रक्कम वाढवून या पुतळ्याचे काम ३३ कोटीवरून ३३० कोटी पर्यंत नेऊ शकतो.

में. धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने भोसरी शितलबाग येथील पादचारी पुलाचा खर्च १० पटीने वाढवला होता . त्याचीच पुनरावृत्ती होऊन छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळ्याचे काम या संस्थेला देऊ नये यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी निवेदन दिले आहे .

वाघेरे यांनी या निवेदनात म्हटले आहे की या कामास आमचा विरोध नाही, आमचा विरोध या ठेकेदाराला आहे. या दैवताच्या पुतळ्याच्या कामातही हा ठेकेदार स्वतःच्या फायदयासाठी खर्चात वाढ करू शकतो व हा खर्च ३३० कोटी रूपयांवर नेवू शकतो. या निविदे प्रक्रियेत रिंग झाल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे में.धनेश्वर कन्स्ट्रक्शनला काम देवू नये. या कामाची फेरनिविदा काढावी अन्यथा आम्हांला आपल्या विरोधात न्यायालयात जावे लागेल

Share this: