‘थेरगाव क्विन’ नंतर इस्टाग्रामवर दहशत करणा-या कोयता भाईला पोलीसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) :इंस्टाग्राम वर अश्लिल भाषेचे आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट व्हायरल करणाऱ्या ‘थेरगाव क्विन’ ला दोनच दिवसांपूर्वी पोलीसांनी अटक केली . इन्स्टाग्रामवर ‘थेरगाव क्विन’ नावाने अकाऊंट चालविणाऱ्या या मुलीबरोबरच आणखी एका इंस्टाग्राम वर हातात कोयता घेऊन फोटो ठेवणा-या भाईला पिंपरी चिंचवड पोलीसांनी मंगळवार (दि.2) रोजी अटक केली आहे.
याबाबत पोलीस हवालदार कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
रवी देविदास जाधव (वय-19, राहणार- सावंत नगर, कॉलनी नंबर 5 दिघे पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी जाधव हा दिघी परिसरात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी सदरची माहिती तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ, पोलीस उपनिरीक्षक भदाणे, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस हवालदार गायकवाड आणि जाधव यांना दिली.या पथकाने आरोपीचा दिघी दत्तनगर परिसरात शोध घेतला असता आरोपी रवी जाधव ला सापळा लावून शिताफिने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात कोयता मिळून आला. आरोपी रवि याने सोशल मीडियावर कोयता हातात घेऊन दहशत करत असल्याचे पोलिसांकडे माहिती मिळाली त्यानुसार त्याच्यावर भादंवि कलम 188 सह भारतीय हत्यार कायदा कलम 04 सह 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास दिघी पोलीस करत आहे.