क्राईम बातम्याबातम्या

तरुणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी;सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) -पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव येथे तरुणीचा पाठलाग करत तिच्या घरासमोर येऊन घरासमोरील वाहनांची तोडफोड करून आईवडिलांना शिवीगाळ केली . तसेच तरुणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली . हा प्रकार मंगळवारी ( दि . ४ ) पहाटे एकच्या सुमारास मोरया पार्क व सुवर्ण पार्क पिंपळे गुरव येथे घडली .

याप्रकरणी २४वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार , सागर सतीश दीक्षित ( वय २८ , रा . पिंपळे गुरव ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपीने फिर्यादी तरुणीचा वारंवार पाठलाग करत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे

. फिर्यादी तरुणीकडे त्याने शारीरिक सुखाची मागणी करून गैरवर्तन केले . मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास सागर पीडित तरुणीच्या घराजवळ गेला . त्याने तरुणीच्या गाड्यांची तोडफोड केली . तरुणीच्या आईवडिलांना शिवीगाळ केली . ‘ तुला मारीन , तुमचे हॉटेल बंद करीन अशी धमकी देत तरुणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली . सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत .

Share this: