चिंचवड येथील अवैध मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड
पिंपरी (वास्तव संघर्ष) :- चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरूद्वारा रोडवरील झोपडपट्टीपाठीमागे पत्रा शेडमध्ये पत्याच्या जुगार अड्ड्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज धाड घातली आहे . त्यात ५ जणांना अटक करण्यात आली आहे.गुरूद्वारा रोडवरील झोपडपट्टीपाठीमागे पत्रा शेडमध्ये पत्यांचा जुगार मटका असा अवैध अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर अड्यावर स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली.
मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या या मटक्या अड्ड्यावरून पोलिसांनी ६ हजार २० रुपये जप्त केले असून पाच जणांवर कारवाई केली आहे.चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरूद्वारा रोडवरील झोपडपट्टीपाठीमागे पत्रा शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार, मटका अड्डा सुरु असल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या गेल्या आहेत. मात्र या ठिकाणावर कारवाई होत नव्हती.
याच परिसरात आणखी एक मटका अड्डा सुरु आहे . तसेच चिंचवडच्या हद्दीत आणखी मटका जुगार अड्डे सुरु असून त्यावरही कारवाई केली जात नाही .
या ठिकाणी मटका सुरु असल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली. त्यानंतर या अड्डयावर स्थानिक पोलिसांनी छापा मारला.या ठिकाणी सुरू असलेला अड्डा हा मटका किंग ‘पप्पू’ याचा आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर हा मटका किंग फरार झाला आहे. ही करावाई पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, रोहिणी शेवाळे आणि त्यांचे पथक यांनी केली.