क्राईम बातम्यामहाराष्ट्र

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी;पोलिसांनी मारहाण केल्याचे आरोपही कोर्टाने फेटाळले

मुंबई (वास्तव संघर्ष) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आली होती . अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली. पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिले होते. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर दाखल झालेल्या केसचा अलीबाग कोर्टातील युक्तीवाद आज संपला असून गोस्वामीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्णब यांना आता 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब गोस्वामी यांचा आरोपही कोर्टाने फेटाळला आहे.

दरम्यान, या निर्णयाविरोधात उद्या अर्णब गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.

Share this: