खुनाच्या संबंधित तरुणीचे फोटो सोशलमिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी १८ जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात एका तरुणाचा सहा जणांनी खून केला होता. या खुनाच्या संबंधित तरुणीचे फोटो सोशलमिडीयावर व्हायरल करण्यात आले होते. याबाबत एका तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोशलमिडीयावर ज्या अकाऊंटवरून तरूणीचे फोटो व्हायरल केले त्या १८ जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात. अशा प्रकारे कोणत्याही वाटसप, फेसबुक, टिकटाॅक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल अॅपवर मेसेज फोटो आणि पोस्ट करु नये असे आवाहन पोलिस आयुक्त विनायक ढाकणे यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाची घटना घडली होती . या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एका तरुणीचे फोटो आणि जातीय तणाव निर्माण होईल , अशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्या आहेत . आता या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या गुन्ह्याचा तपास वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांच्याकडे देण्यात आला आहे . सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी होईल , असे मेसेज कोणीही टाकू नयेत.धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होईल , अशी वक्तव्य किंवा व्हिडिओ टाकू नयेत . सध्या सोशल मिडियावर पिंपरी चिंचवड सायबर सेलचे बारीक लक्ष आहे .